स्त्री शक्ती महिला गृप हिरापुर व कृषी विभाग कोरपना यांच्या सयुक्त विद्यमाने हिरापुर येथे महिला शेतकऱ्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
हिरापुर येथील भगवान बोबडे यांच्या शेतावर आयोजित एक दिवसीय प्रशिक्षित शिबिराचे उद्धघाटन राजुरा चे उपविभागीय कृषी अधिकारी गोंवीद मोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी कोरपना चे तालुका कृषी अधिकारी रविंद्र डमाले, कृषी सहाय्यक रेणुका कोकणे, बिबी येथील प्रगतशील शेतकरी हबीब शेख होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष्या उषाताई काळे होत्या मंचावर प्रमुख पाहुणे हिरापुर येथील पोलीस पाटील योगीता टिपले ,सहाय्यक शिक्षक प्रशांत गोखरे ,सहाय्यक शिक्षक सुनील अलोणे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधव वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशिक्षित शिबिरात उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे यांनी शासकीय योजना, हरभरा, सोयाबीन बिज उत्पादन,सेंद्रिय भाजीपाला लागवड टार्यकोकार्ड चिलोणिस सापळे कसे बनवावे. याविषयीसह विविध मुद्यानवर मार्गदर्शन केले,बिबी येथील प्रगतशील शेतकरी हबीब शेख यांनी प्रशिक्षित शिबीरात बहुपिक पद्धतीने भाजीपाला लागवड, वनस्पतीजन्य किटकनाशक घरच्या घरी करण्याबाबत माहिती दिली.यावेळी हिरापुर येथील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संचालन बबिता वाघमारे तर प्रास्ताविक लता काळे यांनी केले. उपस्थितांचे आभार जयश्रीताई डाहुले यांनी मानले. शिबिराचे यशस्वितेसाठी स्त्री शक्ती महिला गृप च्या संगीता चटप,विनीता काळे,मनिषा बदकी,मनीषा सिडाम,सुवर्णा सिडाम,दिशा काळे,सुवर्णा ठाकरे,वैशाली चौधरी,शारदा मडावी, संगीता कामटकर, तेजल टिपले,माया सिडाम,उषा डाहुले,मथंना पुनवटकर,निर्मला आत्राम, मनिषा जोगी,माधुरी कन्नाके,तेजस्विनी बोबडे,,अर्चना बल्की,मिरा मडचापे रेश्मा डाहुले,यांनी सहकार्य केले.


