दुर्दैवी : नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या #farmer-suicide - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


दुर्दैवी : नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या #farmer-suicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा


राजुरा तालुक्यातील पाचगाव येथील युवा शेतकरी शंकर वारलू बोरकुटे, वय ४१ याने आपल्या शेतात विष प्राशन करून आपल्या शेतात आत्महत्या केली. आज गुरुवारला सकाळी नऊ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. 

मृतक शंकर यांचे वडिलांचे नावावर सहा एकर शेती असून वडिलांचे नावे बँकेचे कर्ज आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व सतत होणार्‍या नापिकीला कंटाळून त्याने आपली जिवनयात्रा संपविली. त्यांचे मागे पत्नी,एक मुलगा व एक मुलगी, आई, वडील व मोठा आप्तपरिवार आहे.या दुर्दैवी घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Pages