अखेर वणी अडेगाव खातेरा बसफेरी सुरू मंगेश पाचभाई यांच्या प्रयत्नाला यश #mangesh-pachbhai - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


अखेर वणी अडेगाव खातेरा बसफेरी सुरू मंगेश पाचभाई यांच्या प्रयत्नाला यश #mangesh-pachbhai

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


कोरोना महामारीच्या नंतर मागील एक महिन्यापूर्वी शासनाने शाळा महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली,पण शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी शासनाने कोणतीही बस सेवा पुरविण्याचा विचार केला नाही.

मागील एक महिन्यापासून अडेगाव- खातेरा- वेडद येथिल कित्येक शालेय विद्यार्थी हे खाजगी वाहनाने प्रवास करीत होते, खाजगी वाहनाने विद्यार्थ्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत होता, तसेच खाजगी वाहनाने जीवघेणा प्रवास करावा लागत होता.हे सर्व लक्षात घेता मंगेश पाचभाई आणि काही विद्यार्थ्यांनी वणी येथे आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले त्या निवेदनाची दखल घेऊन अखेर वणी-अडेगाव-खातेरा बसफेरी सुरू करण्यात आली.

यावेळी अडेगाव येथे मंगेश पाचभाई आणि गावकऱ्यांनी चालकाचा तसेच वाहकांचा सत्कार केला.या बसफेरीचा खडकी-अडेगाव-खातेरा-वेडद येथील विद्यार्थ्या सर्व लाभार्थी आहे. 

Pages