मुलानेच बापाला विळ्याने चिरले पाठवले यमसदनी दोन तासात लावला खुनाचा छडा गडचांदूर पोलिसांची कामगिरी : मर्डर : कोरपना तालुक्यात शेतशिवारात धारदार शस्त्राने खून #murder - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


मुलानेच बापाला विळ्याने चिरले पाठवले यमसदनी दोन तासात लावला खुनाचा छडा गडचांदूर पोलिसांची कामगिरी : मर्डर : कोरपना तालुक्यात शेतशिवारात धारदार शस्त्राने खून #murder

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना:- थोडक्यात वृत्त : 


काल दिनांक 2 जानेवारी ला कोरपना तालुक्यातील नांदगाव सूर्या येथे शिवारातील शेतात रक्ताच्या थारोळ्यात शेतमालकाचा मृतदेह आढळून आला. 


मृतकाचे नाव शंकर फोफरे ( वय 40) असून यांचा मृतदेह त्यांच्या स्वतःच्या शेतात आढळून आला. शंकर कोपरे हे आपल्या शेतात गेले असताना वैयक्तिक वैमनस्यातून त्यांच्या गळ्यावर व छातीवर धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली असल्याचे प्रथमदर्शनी मौका पाहणीत आढळून येत होते. 

काल दुपारच्या सुमारास त्यांची पत्नी व मुलगा शेतात गेले असताना त्यांच्या मृत शरीर रक्ताने माखलेल्या स्थितीत दिसताक्षणी आरडाओरड करत गडचांदूर पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदविण्यात आली. त्यानुसार गडचांदूर पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिल कुमार नायक यांच्या मार्गदर्शनात गडचांदूर चे ठाणेदार गोपाळ भारती यांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंदवित, पुढील तपास करीत आहेत.

सविस्तर वृत्त : 

🔴मुलानेच बापाला  विळ्याने चिरले ; पाठवले यमसदनी 
🔴दोन तासात लावला खुनाचा छडा ;गडचांदूर पोलिसांची कामगिरी : 

 कोरपना तालुक्यातील नांदगाव येथील शंकर फोफरे ( वय 40) यांचा मृतदेह  त्यांचे स्वतःच्या शेतात मौजा कोराडी येथे आढळून आला गडचांदूर पोलिसांनी घटना पंचनामा करून अज्ञात  आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला व तपासणीला सुरुवात केली घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिल कुमार नायक व गडचांदूर चे थानेदार गोपाल भारती यांनी तपासाची सूत्र हातात घेत घटना परिस्थिती लक्षात घेता तपास सुरू केला.

 
प्रदीर्घ अनुभवाच्या आधारावर आरोपी कोणीतरी घरातीलच व्यक्ती आहे याचा आधार घेत चौकशीला सुरुवात केली शेवटी मुलानेच बापाचा आहे हे त्याच्या लक्षात आले शंकर भोकरे यांना एक मुलगा लहानपणापासूनच विकृत मनस्थितीचा असल्यामुळे मामाकडे पाठवण्यात आले मात्र मुलाचा स्वभाव बघता त्याला वडिलांनी नांदगाव ला बोलावून घेतले बिडी  सिगारेट दारू या व्यसनाच्या आहारी मुलगा गेलेला आहे वडिलांच्या लक्षात आले होते.
 

घटनेच्या दिवशी आरोपीचा वर्ग बारावीचा पेपर होता मात्र अभ्यास झालेला नाही हे कारण दाखवत त्यांनी पेपरला दांडी मारली दुपारच्या सुमारास शेतात जेवण करत असताना वडिलांनी जाब विचारला असता बाजूला असलेल्या विळ्याने दहा-बारा वार करत वडिलांना यमसदनी पाठवले गडचांदूर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. 

काही तासातच खुनाचा छडा लावला याबद्दल त्यांच्या कामगिरीची सुद्धा कौतुक केले जात आहे व पालकांनी आपल्या मुलाबाळांकडे त्याच्या वाईट वर्तणूक इकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज समजून घ्यावी असे आव्हान सुद्धा गडचांदूर पोलिसांनी केले आहे

आरोपीचे नाव राहुल शंकर फोफरे वय (वीस वर्ष )खुनाच्या आरोपाखाली भारतीय दंड संविधान 302 अन्वये गुन्हा दाखल व अटक करण्यात आली. 

Pages