काल दिनांक 1 जानेवारी ला विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक विश्रामगृह वणी येथे पार पडली. या बैठकीत कोरोना काळातील विज बिल सरकारने भरावे अन्यथा वीज मंत्र्यांला विदर्भात फिरणे मुश्किल करू अशाप्रकारचा इशारा विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी दिला कोरोना काळातील विज बिल सरकारने भरावे 200 युनिटपर्यंत वीज बिल फ्री करावे त्यानंतरचे वीजदर निम्मे करावे, शेती पंपाला विज बिलातून मुक्त करा, उद्धव सरकारने अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई साठी शेतकऱ्यांचे 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले.
त्यात 9993 कोटी पश्चिम महाराष्ट्राला दिले तर फक्त 7 कोटी विदर्भाच्या शेतकऱ्यांना देऊन ठाकरे सरकारने विदर्भद्रोह व विदर्भ विरोध दाखवून दिला आहे.याचा निषेध असून विदर्भाततील शेतकऱ्यांना सरसकट 25 हजार रुपये प्रतीहेक्टरी नुकसान भरपाई द्यावी तसेच स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करा यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून 4 जानेवारी ला दुपारी 12 वाजता नागपूर येथून वीज व विदर्भ मार्च काढण्यात येणार आहे हा मार्च ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या घराला घेराव घालेल व त्या ठिकाणी हे आंदोलन होईल.
या आंदोलनासाठी संपूर्ण विदर्भातील 11 ही जिल्ह्यातून वीजग्राहक,शेतकरी,तरुण,महिला सामील होणार असून त्यासाठी संपूर्ण विदर्भात बैठका चालू त्याचाच एक भाग म्हणून काल वणी येथे सुद्धा बैठक पार पडली या बैठकीला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप,पूर्व विदर्भ उपाध्यक्ष कपिल इद्दे,जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम पाटील,कोर कमिटी सदस्य रफिक रंगरेज,जिल्हा युवक अध्यक्ष राहुल खारकर,शेतकरी नेते देवराव धांडे,जिल्हा संघटक राजू पिंपळकर,जिल्हा सरचिटणीस मंगेश रासेकर,शहर अध्यक्ष संजय चिंचोळकर,जिल्हा सचिव सुरज महारतळे,प्रा बाळासाहेब राजूरकर,देवा बोबाटे,कनाके पाटील,रवी गौरकर,अजय विधाते बालाजी काकडे,यासह विदर्भवादी उपस्थित होते.
