प्रा. अनिल डहाके यांचा ओबीसी सायकल मार्च वणीत पोहचणार #obc - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


प्रा. अनिल डहाके यांचा ओबीसी सायकल मार्च वणीत पोहचणार #obc

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी प्रा. अनिल डहाके यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौक,चंद्रपूर येथून वणी साठी ओबीसी सायकल मार्च निघाला.या ओबीसी सायकल मार्च मध्ये सुनील वडस्कर,हरिदास पाऊणकर,शंकर मसराम,सतीश मालेकर,मयूर पाउणकर,आशिष गाऊत्रे सहभागी झाले आहे.यापूर्वी त्यांनी 28दिवस जिल्हाभर सायकल यात्रा काढून 1500 की. मी. चा प्रवास करून 70गावांमध्ये सभा घेऊन समाजामध्ये जनजागृती केली.


त्याचा परिणाम म्हणजे चंद्रपूर येथील ओबीसींचा विशाल मोर्चा मध्ये हजारोंच्या संख्येने लोक उपस्थिती होते. 3 जानेवारी 2020 ला वणी येथे ओबीसी विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सायकल मार्च चंद्रपूर येथील छ.शिवाजी महाराज स्मारकला अभिवादन करून सायकल मार्च प्रारंभ झाला व वणी येथील छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ओबीसी विशाल मोर्चात सहभागी होतील.लोकांनी मोठ्या संख्येनी ओबीसी विशाल मोर्च्यात सहभागी व्हावे असे आव्हान प्रा. अनिल डहाके व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. रस्त्यातील गावागावात या ओबीसी सायकल मार्च चे स्वागत होणार आहे.


ओबीसी सायकल मार्च च्या स्वागतासाठी अँड. पुरुषोत्तम सातपुते, बळीराज धोटे, सतीश मालेकर व मोठ्या प्रमाणात विविध सामजिक संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Pages