नायलॉन मांज्या विकनार्यावर तसेच नायलॉन मांज्याची पतंग उडविणार्यावर तात्काळ कार्यवाहीची मागणी. - नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने दिले निवेदन. - तहसीलदार ,नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना दिले निवेदन #rajura - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


नायलॉन मांज्या विकनार्यावर तसेच नायलॉन मांज्याची पतंग उडविणार्यावर तात्काळ कार्यवाहीची मागणी. - नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने दिले निवेदन. - तहसीलदार ,नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना दिले निवेदन #rajura

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा 14 जानेवारी 


मकर संक्रांती निमित्त संपूर्ण देशभरात अत्यंत आनंद व हर्शौल्लासात पतंग उडवून हा सण साजरा केला जातो. लहान -मोठी अशी वयाची बंधन नसलेली ही पतंग उड़वीन्याची कला अनेकजण जोपासतांना दिसतात.परंतु यामुळे पर्यावरणासोबतच अनेकांचे जीव धोक्यात आल्याने यावर तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.


बदलत्या परिस्थितीनुसार आता अनेक प्रकारच्या प्लास्टिकच्या पतंग व नायलॉन मांज्याचे धागे बाजारात विक्रीस येऊ लागले. या नायलॉन मांज्यामुळे पशु-पक्षी ,प्राणी व मानवांचाही जीव धोक्यात आला आहे. अनेकदा नायलॉन मांज्या अडकून प्राणही गमवावे लागले आहे. पशुपक्ष्यांच्या पायांत हे धागे अडकून त्यांनाही आपला जीव गमवावा लागत आहे. 



त्यामुळे नायलॉन मांज्याची विक्री करणारे तसेच या मांज्याचा वापर करून प्लास्टिकची पतंग उडवीनार्यावर तात्काळ योग्य ती कठोर कार्यवाही करण्यात यावी यांकरीता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग सचिव बादल बेले यांच्या नेत्रुत्वात तहसीलदार राजुरा हरिश गाडे , राजुरा नगर परिषदचे नगराध्यक्ष अरुण धोटे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या वतीने प्रशासकिय अधिकारी विजय जांभूळकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संतोष देरकर ,तालुका अध्यक्ष ,शहर अध्यक्ष संदीप आदे ,तालुका संघटक मनोज तेलिवार ,शहर संघटक उमेश लढी, तालुका महिला सचिव अँड.मेघा धोटे, तालुका महिला संघटीका सूनैना तांबेकर, शहर संघटक आशीष करमरकर ,संदीप पोगला शहर संघटक आदिंचि उपस्थिति होती.

Pages