महाराष्ट्र हादरला : जिल्हा सामान्य रुग्णालयाला आग लागून दहा नवजात बालक ठार : नवजात शिशु केअर युनिटला आग -थोडक्यात वाचा आज सकाळची घटना #vidarbh - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


महाराष्ट्र हादरला : जिल्हा सामान्य रुग्णालयाला आग लागून दहा नवजात बालक ठार : नवजात शिशु केअर युनिटला आग -थोडक्यात वाचा आज सकाळची घटना #vidarbh

Share This
खबरकट्टा / विदर्भ : भंडारा:




आज सकाळी 5.30 च्या दरम्यान शॉटसर्किट ने भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात आग लागली ह्या आगीत अतीदक्षता विभाग मध्ये उपचार घेत असलेल्या सतरा नवजात बालकां पैकी दहा बालके जागीच ठार झाली. 

दहा नवजात बालकां पैकी 3 बालके जळून तर सात बालके गुदमरून मृत्यू मुखी पडली. सात नवजात बालकांना वाचवण्यात सामान्य रुग्णालयाला यश आले.अधिक तपास भंडारा जिल्ह्या प्रशासन करीत आहे.

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 10 नवजात बालके दगावली, ह्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मात्र रुग्णालय विभागाकडून खळबळ उडविणारी माहिती समोर आली आहे.

शासकीय जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याची कबुली सुद्धा डॉक्टरांनी दिली आहे, या घटनेची दखल राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेत आरोग्यमंत्री टोपे यांच्याशी संपर्क साधत तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहे.

दुःखद बाब म्हणजे ही बालके नुकतेच जन्माला आली होती मात्र ती रात्र त्यांच्या आयुष्याची शेवटची रात्र ठरली, दुर्दैव म्हणजे बाळ दगावली ही माहिती सुद्धा रुग्णालय प्रशासनाने पालकांपासून लपवून ठेवली.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी घटनेची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडून घेतली, या घटनेबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

Pages