ट्रीपला नेलं, चिकन खाऊ घातलं पालकांना कल्पनाच नाही गोंडपिपरी तालुक्यातील प्रकार ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरु
गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या चेक बोरगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची सहल शाळेतील शिक्षकांनी वडोली मार्गावर असलेल्या इको पार्क मध्ये नेली पार्कमध्ये विद्यार्थ्यांना बायलर चिकन खाऊ घातल्या गेल. यामुळ अकरा विद्यार्थ्यांना फुड पॉईझन झाल आहे.
या विद्यार्थ्यांना गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल आहे. या प्रकाराची माहिती मिळताच पालकांनी रुग्णालय गाठल.
याबाबत शाळेचे मुख्याध्यापक पेन्दोर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मुलांनी जेवण केलं आणि त्यानंतर ते गोल फिरणाऱ्या चकरीवर बसले. त्यामुळे त्यांना मळमळ आणि उलट्या झाल्या. मुलांची प्रकृती आता स्थिर आहे.
विद्यार्थ्यांना सहलीवर घेऊन जात असताना याची माहिती पालकांना देणं गरजेचं होत. मात्र शिक्षकांनी लोकांना माहिती दिल्या नसल्याचं पालकाच म्हणणं आहे. या प्रकारावर पालकानी संताप व्यक्त केला आहे.

