नागपूर रोड वर अपघात; पतीचा मृत्यू ,पत्नी गंभीर - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


नागपूर रोड वर अपघात; पतीचा मृत्यू ,पत्नी गंभीर

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:

चंद्रपूर:- नागपूर चंद्रपूर मार्गावरील नंदोरी शिवारात कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर धडकून पलटी झाली. या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना 20 रोजी दुपारच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल शुक्रवार 20 रोजी गोपाल किसन सिंग (58) व त्यांची पत्नी सूक्ष्मा (50) हे एम. एच. 26 ए. के. 3919 क्रमांकाच्या कारने नागपूर चंद्रपूर मार्गाने नागपूरवरून घुग्घुस येथे जात असताना नंदोरी शिवारात गोपाल सिंग किसन सिंग यांचे कारवरुन नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर धडक देऊन विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर जाऊन पलटली. यात गोपाल सिंग किसन सिंग यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी जखमी झाली.

या घटनेची माहिती जाम महामार्ग पोलिस कर्मचारी स्नेहल राऊत यांना मिळताच रुग्णवाहिका घेऊन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळावर पोहोचले. जखमीला कारमधून बाहेर काढून रुग्णालयात पाठविले व दोन्ही बाजूच्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास समुद्रपूर पोलिस करीत आहेत.


Pages