उपद्रव शोध पथकाची कारवाई;1100 रुपयांचा दंड - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


उपद्रव शोध पथकाची कारवाई;1100 रुपयांचा दंड

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
चंद्रपूर 21 जानेवारी - चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियानातंर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 नुसार सार्वजनीक स्वच्छतेच्या दृष्टीने पतंजली मेगा स्टोर,एन एस ट्रेन, एचपी कॉम्पुटर वर्ल्ड, येवले अमृततुल्य चहा,गादीवाला, आराधना या दुकानांवर रस्त्यावर थुंकणे, कचरा रस्त्यावर टाकणे व दुकानासमोर डस्ट बिन न ठेवल्याने दंडात्मक कारवाईद्वारे 1100 रुपये वसुल करण्यात आले आहे.

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकानदार, हॉकर्स, हातठेलेधारक, फेरीवाले तसेच इतर सर्व व्यावसायिकांना त्यांच्या आस्थापनेवर कचरापेटी ठेवणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास आणि आस्थापनेच्या १० चौरसफूट परिसरात अस्वच्छता आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा चंद्रपूर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने दिला आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत " उपद्रव शोध पथक " ( NDS ) तयार करण्यात आले असुन सदर पथकाद्वारे शहरातील सार्वजनीक स्वच्छता अबाधित ठेवणे, घनकचरा व्यवस्थापन नियमाची अंमलबजावणी करणे, उपद्रव थांबविणे, प्लास्टीक कचरा नियम अंमलबजावणी व नागरीकांमध्ये स्वच्छता ठेवण्याच्या कृतीमध्ये व्यावहारीक बदल घडविणे व दंडात्मक कारवाई करणे इत्यादी कारवाई केली जात आहे.

Pages