अत्यंत दुर्मिळ : " रोमा" बछड्यांसह फेरफटका मारताना कॅमेऱ्यात कैद...! - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


अत्यंत दुर्मिळ : " रोमा" बछड्यांसह फेरफटका मारताना कॅमेऱ्यात कैद...!

Share This
चंद्रपूर /मोहुर्ली :

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रोमा नावाची वाघीण (Tigress) आपल्या बछड्यांसह फेर फटका मारतांना अत्यंत दुर्मिळ असलेले दृश्य नागपुरातील युवा wildlife वाईड लाईफ फोटोग्राफर photographer दीप काठीकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलेले हे छायाचित्र आहे.


वाघांच्या हमखास दर्शनासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे. ताडोबातील कोअरच्या चार प्रवेशद्वारांपैकी व्यवस्थापन मोहर्ली व कोलारा गेटकडे अधिक सुविधा आहेत. अन्य प्रवेशद्वार उपेक्षित असतात. यामुळेच पर्यटकसुद्धा मोहर्ली व कोलारा गेटवरून ताडोबात जाण्यास पसंती देतात. रामदेगी, खुटवंडा गेटकडे पर्यटक आकर्षित होत नाहीत, अशी खंत रामदेगी, खुटवंडा गेटवरील गाईड, जिप्सी चालक व्यक्त करतात.

रामदेगी गेटवर व्यवस्थापन लक्ष देत नसले, तरी वाघांचा वावर मात्र या परिसरात अधिक आहे. याच गेट परिसरात माया वाघिणीने दोनदा बछड्यांना जन्म दिला. ते याच परिसरात वास्तव्यात होते. मायानंतर मयूरी वाघिणीने काही काळ आपल्या विविध छबी दाखविल्या. आता झरणी वाघिणीचे तीन बछडे मोठे होत आहेत. हा झरणीचा परिवार पर्यटकांना सुखावून जात आहे. रामदेगी गेटवरून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना झरणी आपल्या अनेक मुद्रांचे दर्शन देत आकर्षित करीत आहे. त्यामुळे रामदेगी गेटचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले असल्याचे गाईड, चालक सांगत आहेत.


झरणीसह बछडे पाणी पिताना झाले होते कॅमेऱ्यात कैद :
चिमूर तालुक्यातील खडसंगी बफर झोनअंतर्गत येणाऱ्या रामदेगी बफर झोनमध्ये मागील वर्षी झरणीने तीन बछड्यांना जन्म दिला होता चार महिने आपल्या दुधावर वाढवून तिने या तीन बछड्यांना बाहेर काढले.त्यानंतर ते आईसोबत शिकारीचे धडे गिरवत रामदेगी गेट परिसरातील मोहबोडी वॉटर होलजवळ पाणी पीत असताना पर्यटकांना त्यांचे दर्शन झाले होते . झरणीच्या ही परिवाराला नागपूर येथील फोटोग्राफर परसोडकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते.

Pages