"वरोरा आणि आसपासच्या परिसरामध्ये मागील चार-पाच दिवसांपासून विविध भागात एक विमान अतिशय जळून घिरट्या घालत असल्याने ग्रामस्थ आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. रविवारला हे विमान वरोडा-माजरी परिसरामध्ये घिरट्या घालताना आढळले तेव्हा नागरिकांनी याची माहिती संबंधित अधिकार्यांना दिली.
खबरकट्टा / चंद्रपूर :
वरोव आणि वणी plane crash या भागामध्ये जंगल आणि कोळशाच्या खाणीची विपुलता आहे. नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोन्याचे साठे असल्याची माहिती पुढे आली असताना, या भागामध्ये अज्ञात विमानाने गिरट्या घालाव्या म्हणजे नक्कीच या भागात खनिज संपत्ती असल्याचा कयास बांधला जात आहे.
या परिसरामध्ये आजही बोअरवेल अधिक खोलात गेली असता त्या ठिकाणाहून कोळसा लागतो तर काही ठिकाणी पाण्याला तेलकट वास येतो. काही वर्षांपूर्वी या भागामध्ये ‘ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन’ने पाहणी केली होती, हे विशेष.
या संदर्भात एका अधिकार्यांना विचारले असता, आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर ते म्हणाले की, हे plane crash विमान वरोरा-वणी भागातील भूगर्भातील खनिज संपत्तीचे साठे याबाबत सर्वेक्षण करीत आहे.
या भागात वने आणि मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध असून, यापुढे त्याचा शोध घेतला जाईल. याकरिताच हे विमान हे घिरट्या घालत असल्याचे अधिकारी म्हणाले. नागरिकांनी याबाबत गोंधळून जाऊ नये, असे आवाहनदेखील त्यांनी केले."

