खबरकट्टा /चंद्रपूर - ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव येथील, संदर्भ भैसारे (22, रा. पिंपळगाव भो, ता. ब्रम्हपुरी) हा मुलगा मकरसंक्रांतीनिमित्त मित्रांसोबत वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेला असता. दि.15 जानेवारीला दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास सदर्भ भैसारे याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
मकरसंक्रातीनिमित्त वैनगंगा नदीच्या काठावर परिसरातील गावातील नागरिकांची मोठी गर्दी असते. पिंपळगाव भो. येथील संदर्भ भैसारे हा गावातील काही मित्रांसोबत आंघोळीसाठी वैनगंगा नदीच्या आवळी घाटावर गेला होता. नदी पात्रात उतरुन आंघोळ करीत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
पिंपळगाव हे ब्रम्हपुरी तालुक्यात असून, आवळी गाव हे नदीच्या दुसर्या बाजूला भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात आहे. घटनेची माहिती कळताच दोन्ही तालुक्यातील पोलिस कर्मचारी आवळी घाटाकडे रवाना झाले."

