चंद्रपूर जिल्ह्यात वाघिणीचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


चंद्रपूर जिल्ह्यात वाघिणीचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:

चंद्रपूर/माजरी - भद्रावती तालुक्यातील माजरी येथील रेलवेच्या मेनलाईन जवळील सी केबिन च्या मागील भगत रविवारी वाघिणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

याबाबत रेल्वे कर्मचाऱ्याने माजरी पोलिसांना माहिती दिली. माजरी येथील देवराव पाटेकर यांच्या शेतात वन्यप्राण्यांपासून शेतीच्या पिकाचे संरक्षण व्हावे यासाठी विद्युत प्रवाह ची फेंसिंग करण्यात आली होती. Tigress dead body वाघिणीचा मृतदेह फेंसिंग च्या ताराला गुंडाळला होता, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रथमदर्शनी अंदाजात विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने वाघिणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज लावला.

वनविभागाने मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन साठी पुढे पाठविला असून अहवाल आल्यावर वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल.





Pages