खबरकट्टा/ चंद्रपूर:
अनेक वेळा बालक जन्माला आल्यानंतर एक-दोन वर्षे त्याची अपेक्षित वाढ होत नाही आणि त्याचे कारणही समजत नाही. अशावेळी पालक चिंतेत पडतात. मात्र, नवजात बालकांची शासकीय रुग्णालयात मोफत रक्त तपासणीतून बालकाच्या जन्मजात व्यंगाचे निदान केले जाऊ शकते. नवजात तपासणी योजनेच्या माध्यमातून ही तपासणी केली जाते. ज्यातून नवजात बालकाला व्यंग आहे की नाही, याचे निदान होते. मागील वर्षभरात अनेक मुलांची तपासणी केल्या आहे. यात अनेकांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याचे समोर आले आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याची ठराविक वेळेनंतर रक्ताची तपासणी केली जाते. ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह, म्हणजेच थायरॉईड, हिमोग्लोबिन कमी आहे. अशांना कल्पना देऊन उपचार करून घेण्यास सांगितले जाते. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणारेच जास्त बालक आढळत असल्याचे सांगण्यात येत आहे.
बाळ जन्माला आल्यानंतर ४० ते ७२ तासांच्या कालावधीत हे रक्त घेतले जाते. त्यानंतर प्रयोगशाळेच्या माध्यमातून पुढील तपासणीसाठी पाठविले आहे.
मोठ्या माणसांप्रमाणे बाळाचे रक्त हाताच्या धीत नसेतून घेतले जात नाही. त्याला इंजेक्शनहीं नंतर लावले जात नाही. पायाच्या टाचाला प्रिक सुन करून एका फिल्टर पेपरवर हे रक्त घेतले. जाते. अतिशय नाजूक असलेली ही प्रक्रिया बाळाला समजूही दिली जात नाही.
नॉर्मल प्रसूती झालेल्या मातांना काही तासांतच रुग्णालयातून सुटी दिली जाते. त्यामुळे ४८ ते ७२ तासांच्या कालावीत होणाऱ्या या तपासणीपासून अनेक बालक वंचित राहतात. असे होऊ नये यासाठी शासन आणि आरोग्य विभागाने पुढाकार घेणे गरजेचे आहे
एकदा रक्त्त घेतल्यानंतर त्यात हिमोग्लोबिनसह थायरॉईड आणि १७ ओएच नावाची तपासणी केली जाते. यात पुरुष असूनही स्त्रियांची काही लक्षणे असतील तर त्याची तपासणी होते. एचबी कमी असेल तर थैलेसिमिया किंवा अनिमिया याची तपासणी केली जाते.

