पोलिसांचे आवाहन : या चोरापासून सावधान - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


पोलिसांचे आवाहन : या चोरापासून सावधान

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:

मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरात एक इसम स्वतःला मूक-बधिर असल्याचे भासवीत सकाळच्या सुमारास घरी प्रवेश करीत मौल्यवान वस्तूंची चोरी करीत आहे.

ज्यावेळी नागरिक सकाळी फिरायला जातात त्यावेळी हा इसम कपाळाला टीका लावत मूक-बधिर असल्याचे भासवीत देणगी मागतो.मात्र नागरिक घरी नसल्याची संधी साधत हा इसम घरातील रोख रक्कम, लॅपटॉप व मोबाईल फोनची चोरी करतो. त्याला कुणी हटकले तर तो स्वतःला मूक-बधिर असल्याचे भासवित आपली सुटका करीत पळ काढतो, असे प्रकार तो गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहरात करीत आहे.
या इसमाने बंगाली कॅम्प, इंदिरानगर परिसरात असे प्रकार केले असून त्याच्यावर रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे रामनगर पोलिसांनी चंद्रपुरातील जनतेला आवाहन केले की सदर व्यक्ती आपल्या घरी आला किंवा कुणाला दिसल्यास तात्काळ त्याला पकडत रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करावे किंवा रामनगर पोलिसांच्या 9850829266. हर्षल एकरे. 7798386838, लालू यादव- 9552800532, पोलीस स्टेशन रामनगर 07172-253200 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांनी केले आहे.

Pages