कृषि उत्पन्न बाजार समितीत महिलेवर अत्याचार - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


कृषि उत्पन्न बाजार समितीत महिलेवर अत्याचार

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय पावडेसह एका कर्मचान्याविरुद्ध कार्यालयात रोजंदारीने काम करणाऱ्या एका महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात २८ जानेवारी रोजी विनयभंगाची तक्रार केली. या तक्रारीवरून संजय पावडे आणि बालाजी मंडरे या दोघांविरुद्ध कलम 354, 354 (अ) 34. अन्यये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्यापर्यंत या दोघांनाही अटक करण्यात आली नाही पावडे याच्याकडून धमकी दिली जात असल्याचा आरोप पीडितेने चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला असून, पावडे याला तत्काळ अटक करण्यात यावी तसेच त्याला सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी पीडितेने केलीआहे.

पीडित महिला कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात रोजंदारीवर काम करते. मात्र, मागील काही दिवसांपासून बालाजी मंडरे आणि संजय पावडे हे दोघे तिला मानसिक त्रास देत आहेत. तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली जात असून, मागणी पूर्ण न केल्यास कामावरून काढण्याची धमकी दिली जात असल्याचे तिने म्हटले आहे. यापूर्वीही येथे काम करणाऱ्या महिलांचा संजय पावडे यांने छळ केल्याचा संशय तिने व्यक्त केला आहे.
कोणत्याही महिलेला येथे अधिक काळ काम करू दिले जात पन्न नाही. दर पाच ते सहा महिन्याला त रोजंदारीवरील महिला बदलविल्या त्र, जातात, याचे कारण काय असा नून प्रश्नही तिने उपस्थित केला. तय नोव्हेंबर महिन्यात सुटी असतानाही क मंडरे याने कार्यालयात बोलाविले. यानंतर गाडी पुसण्याचे कापड आणण्याचे उद्देशाने कार्यालयात पाठविले. यावेळी संजय पावडे कार्यालयात बसून होता. त्याने लाइट बंद करून विनयभंग केला. आरडाओरड केल्याने त्याने सोडून दिले.

5 जानेवारीरोजी पुन्हा असाच प्रकार केला. यानंतर त्याने माफीही मागितली. परंतु, पुढेही असा प्रकार सुरू ठेवल्याने 28 जानेवारी रोजी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हाही दाखल करण्यात आला. परंतु, अद्यापपर्यंत त्याला पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर तिने संशय व्यक्त केला असून, त्याला सेवेतून निलंबित करण्याची मागणी पीडितेने केली आहे.

Pages