प्रतिबंधित सुगंधीत तंबाखुसह 7,62,300 चा मुददेमाल जप्त - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


प्रतिबंधित सुगंधीत तंबाखुसह 7,62,300 चा मुददेमाल जप्त

Share This
खबरकट्टा/यवतमाळ:

यवतमाळ जिल्हयात अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना अवैध धंदयाविरुध्द प्रभावी कारवाई करण्याचे आदेशीत केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी त्यांचे अधिनस्त पथकांना अवैध धंदयाची गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सूचना दिल्या होत्या.

दिनांक 30/01/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पो.स्टे. वणी परीसरात असतांना गोपणीय बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, एक सिल्वर रंगाची हुंडाई कंपनीची वरणा कार महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखू व गुटखा घेवुन लाल पुलोया मागे वणी शहरात दाखल होणार आहे. अशी विश्वसनिय माहिती प्राप्त झालेवरून स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने देश प्रेमी धावा चिखलगांव वणी येथे रोडवर रात्रीपासून नाकाबंदी लावून थांबले असतांना नाकाबंदी दरम्याण गोपनीय माहिती प्रमाणे वर्णन असलेली एक सिल्वर रंगाची हुंडाई कंपनीची वरणा कार क्रमांक एम.एच.34 ए.ए. 7766 ही दिसुन आल्याने पोलीस स्टाफचे मदतीने सदर वाहनास थांबवुन वाहनचालकास त्याचे नांव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नांव अब्दुल नदीम अब्दुल मोबीन वय 30 वर्ष. रा. साई नगरी बणी ता. वणी जि. यवतमाळ असे सांगीतल्यानं पंचासमक्ष त्याचे वाहनाची झडती घेतली.

त्यावेळेस 1) मजा 108 हुक्का शिशा सुगंधीत तंबाखुचे 200 ग्राम क्षमतेचे 160 नग, २) क्रेज़ सुगंधीत तंबाखुचे 450 ग्राम क्षमतेचे 22 नग, असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखू व आरोपीचे अंगझडतीत 01 मोबाईल मिळून आल्याने सदर मुददेमाल व मुददेमाल वाहून आणन्याकरीता वापरात आणलेले वाहन असा एकुण 7,62,300/- रुपये किमतीचा मुद्देमाल व आरोपी अब्दुल नदीम अब्दुल मोबीन वय 30 वर्ष, रा. साई नगरी वणी ता. वणी जि. यवतमाळ यास ताब्यात घेवून अन्न सुरक्षा अधिकारी यवतमाळ यांना सदर बाबतीत माहोती देवून पाचारण केले.
आज दिनांक 31/01/2023 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी श्री घनश्याम देदे अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यवतमाळ यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी अब्दुल नदीम अब्दुल मोबीन वय 30 वर्षे, रा. साई नगरी वणी ता. वणी जि. यवतमाळ याच विरुद्ध पोस्ट वणी येथे भादंवि तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा 2006, नियम व नियमणे 2011 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हयात कोठेही असा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु अथवा गुटखा विक्री होत असल्यास किंवा त्याचा साठा करून ठेवला असले बाबत माहिती प्राप्त झाल्यास त्याबाबतची माहीती स्थानिक गुन्हे शाखेला कळविण्यात यावी असे आवाहन जिल्हा पोलीस दला तर्फे करण्यात येत आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुश जगताप, श्री. प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि अमोल मुडे, पोहवा उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, पोना सुधीर पिदुरकर, सुधीर पांडे, चापना सतिष फुके सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Pages