खबरकट्टा / चंद्रपूर : भद्रावती
भद्रावती येथे गुरु नगर येथील नेताजी कॉन्व्हेंटला भिंतींना तडे गेले आहेत, निवासी ठिकाणी हे कॉन्व्हेंट बेकायदेशीरपणे चालवले जात आहे. तिथे लहान मुलांना शिकवले जाते. हे अत्यंत धोकादायक असून भविष्य कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो.कॉन्व्हेन्ट ची अवस्था अत्यंत वाईट असून स्थानिकांनी तक्रार केली.
या प्रकरणी आम आदमी पार्टी सुरज शाह यांच्या नेतृत्वाखाली व तालुका सचिव सुमित हस्तक यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती येथे पक्षाच्या शिष्टमंडळाने गुरु नगर येथील नेताजी कॉन्व्हेंटला भेट दिली.
भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शाळेची इमारत नवीन पद्धतीने बांधावी किंवा शाळा चांगल्या ठिकाणी हलवावी, असे स्थानिकांनी सांगितले. या प्रकरणाबाबत आमचे शिष्टमंडळ तेथे पोहोचले असता तेथील प्राध्यापकांशी बोलले असता त्यांना लवकरात लवकर कॉन्व्हेंट अन्य ठिकाणी हलवण्याचा इशारा देण्यात आला.
त्यावेळी तालुकाध्यक्ष सोनल पाटील, तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकर, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, प्रफुल्ल भाऊ शेलार, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर सचिव विजयभाऊ सपकाळ, शहर संघटन मंत्री अनिलकुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज भाऊ शेख, सचिन भाऊ पाटील, मंगेश भाऊ खंडाळे, केशवभाऊ पचारे, श्यामभाऊ पिंपळकर, नितीन भाऊ देवगड़े, रितेश नगराळे, राजेश भाऊ नरवडे, बाळूभाऊ बांदुरकर, प्रदीप भाऊ लोखंडे, चेतन भाऊ खोब्रागडे, संजय भाऊ सातपुते, डोरी भाऊ स्वामी, घनश्याम भाऊ गेडाम आणि अनेक कार्यकर्ता उपस्थित होते.

