अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारा चंद्रपुरातून हद्दपार - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारा चंद्रपुरातून हद्दपार

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या विधानावरून समाजमाध्यमात अश्लील टिपण्णी करणाऱ्यांवर थेट जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. हद्दपार झालेल्याने नगरसेविका असलेल्या पत्नीसोबत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला होता.

गोंडपिपरी येथील खेमदेव उर्फ खेमचंद गरपल्लीवार वय 49 रा. तुकडोजी नगर गोंडपिपरी हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. ते गोंडपिपरीच्या ग्रामपंचायतचे सदस्य होते. सध्या त्यांच्या पत्नी शारदा गरपल्लीवार गोंडपिपरीच्या नगरसेविका आहेत. त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या. यानंतर गरपल्लीवार दाम्पत्याने आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला व सत्तास्थापनेला पाठिंबा दिला. यादरम्यान अमृता फडणवीस यांनी वेशाव्यवसायाबाबत एक विधान केले होते. त्यांच्या मुद्यावरून खेमदेव गरपल्लीवार यांनी अमृता फडणवीस यांच्याविरोधात समाजमाध्यमातून अश्लील टिपण्णी केली होती.

खेमचंद गरपल्लीवार चंद्रपूर जिल्हयात सन 2020 पासुन गुन्हे करीत असुन जमीन खरेदी-विक्री संबंधाने लोकांची फसवणुक करीत तो लोकांना जिवे मारण्याची धमकी देणे, धक्का-बुक्की करुन अश्लील भाषेत शिवीगाळ करणे, तरुण पिढीला व्यसन लावुन त्यांचे भविष्य खराब करणे या सारखे गुन्हे करण्याचा सवयीचा असुन त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे विविध कलमांन्वये एकुण 6 गुन्हे दाखल करून सदर गुन्हयात अटक करुन प्रतिबंधात्मक कारवाई सुध्दा करण्यात आली आहे.

परंतु सदर इसम निर्दालेला गुन्हेगार व झगडा, भांडण शिवीगाळ करणे, जिवे मारणे बाबत धमकाविणे व हिंसेच्या सवयीमुळे साक्षीदार / सामान्य नागरीकांच्या जिवीत व मालमत्तेच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करीत असल्यामुळे त्यांच्या याप्रवृत्तीमुळे भविष्यात गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडुन सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे
समाजहिताच्या दृष्टीने तसेच सदर इसमाचे गुन्हेगारी प्रवृत्तीत बदल होवुन चांगले वर्तणुकीसाठी तसेच लोकांचे मनातील भिती दूर होण्याकरीता आणि जिल्हयातील शांतता व सुव्यवस्य अबाधीत राहावी याकरीता सदर इसमास चंद्रपूर जिल्हयातून हद्दपार करणे आवश्यक असल्याने त्याबाबतचा योग्य प्रस्ताव तयार करून सदर प्रकरणाचा नियमित पाठपुरावा करण्यात आल्याने उपविभागीय दंडाधिकारी गोंडपिपरी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1) (अ) (ब) अन्वये खेमदेव उर्फ खेमचंद किसनराव गरपल्लीवार यास चंद्रपूर जिल्हयाच्या हद्दीतून हद्दपार / तडीपार करण्यात आल्याचे आदेश निर्गमित केले आहे.

यापुढे ही सार्वजनिक शांतता भंग करणारे हिंसेच्या सवयीच्या गुन्हेगारांविरुद्ध सुद्धा अशाच प्रकारची हद्दपारी कारवाही करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांची स्पष्ट केले आहे

Pages