शासनातर्फे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारसाठी अर्ज आमंत्रण - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


शासनातर्फे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारसाठी अर्ज आमंत्रण

Share This

खबरकट्टा/ चंद्रपूर:

16 ते 30 जानेवारी कालावधीत अर्ज सादर करण्याचे आवाहन

क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करत असते.

शासनाने नुकत्याच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहित केली असून या नियमावलीनुसार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन स्वतंत्र वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील जेष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्याकडून दि. 16 ते 30 जानेवारी, 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहे.

सदर अर्जाच नमूना https://sports.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर भेट देऊन, डाऊनलोड करून घ्यावा तसेच परिपूर्ण अर्ज भरून संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपरोक्त कालावधीत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.

Pages