अभिनेता सोनू सूद यांनी एका चहा विकनाऱ्याला पार्टनरशिप मागितल्याचा व्हिडीओ कालपासून चंद्रपूर जिल्ह्यातील सोशल मीडिया वर वायरल होत आहे.
या व्हिडीओ कथनानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी येथे तीन दिवशीय आमदार महोत्सवाचे अयोजन केले होते यात शेवटच्या दिवशी अभिनेता सोनू सूद यानी हजेरी लावली होती.हा कार्यक्रम आटोपून ब्रम्हपुरी ते नागपूर असा परतीचा प्रवास करत असतानाचा हा व्हिडीओ असल्याचे लक्षात येते.
ब्रम्हपुरी ते नागपूर हायवे वर भिवापूरी नावाचे लहानसे गाव आहे. गावालागत महामार्ग असल्याने गावातील " अक्षय नागोसे "नामक युवकाने ये-जा करणाऱ्या प्रवाश्यांची सोय म्हणून रोडलगत " तलप " नामक चहा टपरी सूरू केली. याच टपरिवार अभिनेता सोनू सूद रात्री कॉफी पिण्यासाठी उतरला असतानाचा हा व्हिडीओ असून त्यात सोनू सूद त्याला विचारतो की दिवसाभारत किती कप विक्री झालीये,त्यावर अक्षय सांगतो की 2-300कप.. हे एकूण सोनू सूद त्याला थेट " पार्टनरशिप " च मागतो....
बाजूला दोन व्यक्ती उभ्या हे सर्व बघत असतात तेवढ्यात सोनू सूद नागेश नामक युवकाला गुटखा खाण्यास मनाई करत, गुटखा थुंकण्यास सांगतो व अक्षय ला आणखी अधिक चहा विक्री कर असे म्हणतं निघतो.

