खबरकट्टा/चंद्रपूर:
चंद्रपूर महानगरपालिका, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा ( कुष्ठरोग ) व अॅथलेटिक्स असोसिएशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रन फॉर लेप्रसी मॅरेथॉनचे आयोजन 30 जानेवारी रोजी सकाळी 6:30 वाजता गांधी चौक चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.
या मॅरेथॉन स्पर्धेत 16 वर्षावरील मुला- मुलींना सहभाग घेता येणार असुन माध्यमिक शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी, सर्वसामान्य नागरीक (महिला व पुरुष), कुष्ठरोगाबाबत कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, शासनाचे विविध विभाग, डॉक्टर संघटना, पुरस्कार प्राप्त खेळाडू, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती यांचाही समावेश राहणार आहे.
स्पर्श कुष्ठरोग अभियाना अंतर्गत या वर्षीचे घोषवाक्य " कुष्ठरोगाविरोधात लढा देऊन कुष्ठरोगाला इतिहास जमा करूयात " हे असुन या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक येणाऱ्यास अनुक्रमे 4000/-, 2500/- व 1500/- रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे पुरुष व महीला गटास पारितोषिकाची रक्कम सारखीच आहे.
पुरुषांकरीता मॅरेथॉन मार्ग पुढीलप्रमाणे असणार आहे. सुरवात गांधी चौक- जटपुरा गेट- प्रियदर्शिनी चौक- वरोरा नाका - जनता कॉलेज परत जनता कॉलेज- वरोरा नाका चौक- प्रियदर्शिनी चौक- जटपुरा गेट गिरनार चौक ते गांधी चौक
तर महिलांकरीता मॅरेथॉन मार्ग सुरवात गांधी चौक- जटपुरा गेट- प्रियदर्शिनी चौक- वरोरा नाका परत वरोरा नाका प्रियदर्शिनी चौक जटपुरा गेट गिरनार चौक व स्पर्धेचा समारोप गांधी चौक येथे करण्यात येणार असल्याचे मनपा आरोग्य विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ वनिता गर्गेलवार यांनी कळविले आहे.
अधिक माहिती व नोंदणी करण्यास मनपा आरोग्य विभाग, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा ( कुष्ठरोग) कार्यालय, अॅथलेटिक्स असोसिएशन चंद्रपूर कार्यालय किंवा रोशन भुजाडे - 9373704553, रत्नदीप माऊलीकर- 8766593388, सुरेश अडपेवार - 9822449916 येथे संपर्क साधता येणार असुन वेळेवर नोंदणी करता येणार नसल्याचे आयोजकांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
