पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी येथील शेतकरी पीक संरक्षणासाठी लाकडी खुठे तुरीच्या सभोवताल ठोकली होती. तुरी मळई करण्यासाठी तार व खुटे काढण्यासाठी शेतकरी गेला असता अचानक पाय घसरून खुठ्यासकट बाजूला असणाऱ्या विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून दुदेवी मृत्यू झाल्याची घटना  दि. २२ जानेवारीला रविवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. मृतक शेतकऱ्याचे नाव सोमनाथ शुकनाथ ईस्टाम रा. चेकपिपरी असे आहे.

घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पीएसआय मोगरे, पोलिस कर्मचारी वंदिराम पाल, जाधव, शांताराम पाल घटनास्थळी दाखल होऊन मृतकाचे शव विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे आणण्यात आले.

पुढील तपास ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनात गोंडपीपरी पोलीस करीत आहे. मृतक सोमनाथ हा अल्पभूधारक शेतकरी असून त्याला पत्नी व तीन मुली असून घरची परिस्थिती

Pages