यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यातील श्री.रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत अध्यक्ष व संचालकांच्या संगनमतातून भ्रष्टाचार व आर्थिक घोटाळा झाला असल्याची तक्रार पुराव्यानिशी सहकारमंत्र्यांसह सहकार आयुक्तांकडे करण्यात आल्याची माहिती चंद्रपूर येथे श्रमिक पत्रकार परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेतून झाल्यानंतर संस्थेच्या मुख्य शाखा वणी येथे कालपासून खातेदारांच्या पैसे काढण्याकरिता (विथड्रॉवल)रंगाचं रांगा लागल्या असल्याचे चित्र आहे तर् काल सोमवारी एकाच दिवसात अंदाजे 10कोटी रुपयांचे विथड्रॉवल आले असल्याचे नाव न लिहिण्याच्या अटीवर संस्थेच्या एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने टीम खबरकट्टा ला सांगितलं.ही स्थिती बघता आज मंगळवारी सुद्धा शाखेत चिक्कार गर्दी असल्याचे चित्र आहे.
खबरकट्टा / यवतमाळ : वणी -
श्री. रंगनाथ स्वामी नागरी सह पतसंस्था मर्या. वणी या संस्थेमध्ये सभासदांच्या जवळपास 700 कोटींच्या ठेवी आहे, अध्यक्ष व संचालक मंडळाच्या अनागोंदी व अमर्याद कर्ज वाटपामुळे धोक्यात आल्या आहे. पतसंस्थेचा मोठ्या प्रमाणात NPA वाढला असुन संस्था प्रत्यक्षात तोटयात असतांना खोटा नफा दाखवून सभासदांची दीशाभुल करणे सुरू असल्याचा आक्षेप पत्रकार परीषदेमध्ये करण्यात आला.
पतसंस्थेने एका प्रकरणात इंडस्ट्रीज झोन वरील जमीनीवर 5 कोटी रू. कर्ज दिले आहे. सदर जागेची शासन परवानगी नसतांना ले-आऊट मंजूर नसतांना इंडस्ट्रीज झोन वरील या जमीनीवर 5 कोटीचे कर्ज दिलेले आहे. विशेष म्हणजे यातील 4 भागीदारांपैकी फक्त दोनच भागीदारांनी महाणखत करून दिलेले आहे.
आणखी एका प्रकरणात पतसंस्थेने रंगनाथ चेंबर ची तीन मजली इमारत 3 कोटी 16 लक्ष 696 रुपयात विकत घेतली आहे पण अजून पावेतो त्याची खरेदी करण्यात आलेली नसून प्रत्यक्षात मात्र बरीच मोठी रोख रक्कम जागेच्या मालकाला अदा करण्यात आली आल्याचे आरोप चंद्रपूर येथे श्रमिक पत्रकार परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेतून झाल्यानंतर खातेदारांची मात्र तारांबळ उडाली आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप खोटे असल्याचे अध्यक्ष देविदास काळे यांचे स्पष्टीकरण आहे.ज्यांनी पत्रकार परिषदेतून आरोप केले आहे त्यांनी काही दिवसापूर्वीच संस्थेतील 1 कोटी 81 लाख ठेवी गबाळ केल्याचे उघडकीस आले होते. म्हणून त्यांना संस्थेतून काढण्यात आले. त्यात त्यांच्या पत्नी सुद्धा होत्या. ऑडिट रिपोर्ट आल्यावर फौजदारी कारवाई करू.
या संस्थेमध्ये पत्रकार परिषद घेणाऱ्यांचे एकही ठेवी नाही. उलट यांनी इतर संस्थेमध्ये खातेदारांना भूल थापा देऊन इतर संस्थेत ठेवी ठेवण्यास सांगत होते.त्यांना नोकरीवरून काढण्यात आले. त्यामुळेच चिडून त्यांनी तक्रार केली. स्थानिक राजकारण्यांनी या पाच लोकांना पुढे केले आहे. बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे. भ्रष्टाचाराचे आरोप खोटे आहेत.नियमानुसारच पतसंस्थेकडून कर्जप्रक्रिया पार पाडली जाते, अशी प्रतिक्रिया रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष अँड. देविदास काळे यांनी दिली.
या पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाने मनमानी पध्दतीने कारभार चालविलेला आहे. या सर्व प्रकरणामध्ये सहकार मंत्री श्री अतुल सावे, सहकार आयुक्त पुणे, विभागीय सहनिबंधक कार्यालय अमरावती तसेच सहाय्यक निबंधक कार्यालय यवतमाळ यांचेकडे तक्रार करण्यात आलेली असून उपरोक्त सर्व प्रकरणांची ताबडतोब चौकशी सुरू करण्यात यावी. जर संस्थेची चौकशी झाली नाही तर 48हजार सभासदांचे हित आणि अनेकांचे पैसे बुडण्याची शक्यता असल्याचा संभ्रम खातेदा्रांत झाल्याने कालपासून वणी येथे खातेदारांच्या रांगाच रांगा लागल्या असल्याचे कळते.

