महाराष्ट्राला मिळाले राज्यगीत:'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा स्वीकार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


महाराष्ट्राला मिळाले राज्यगीत:'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा स्वीकार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Share This
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आता राज्यगीत मिळाले आहे.
खबरकट्टा / महाराष्ट्र :

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या 19 फेब्रुवारीपासून हे गीत अंगिकारण्यात येईल, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक राज्याला एक ठराविक गीत असावे, असे केंद्र सरकारने सुचवले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड करण्यात आली आहे.

शासकीय कार्यक्रमांमध्ये लावले जाणार

'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताला राज्यगीताचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा यापूर्वीच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. अखेर त्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व मोठ्या शासकीय कार्यक्रमांमध्ये हे गीत लावले जाणार आहे. .

महाराष्ट्राचे गौरव गीत

महाराष्ट्र गौरव गीत अशी 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताची ओळख आहे. विशेषत: सीमा आंदोलनादरम्यान हे गाणे आंदोलकांच्या तोंडी होते. कवी राजा बढे यांनी हे गीत लिहिले आहे. संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत शाहिर अमिर साबळे यांनी आपल्या खणखणीत आवाजाने अजरामर केले आहे.

Pages