वाघाने झेप घेताच " त्यांनी" घेतल्या नदीत उड्या. - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


वाघाने झेप घेताच " त्यांनी" घेतल्या नदीत उड्या.

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर - वरोरा
शेतातील गोठ्याजवळ वाघ दिसल्याने एका शेतकऱ्याने आरडाओरडा केला.ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली.काही ग्रामस्थ वाघाच्या अगदी जवळून गेले.वाघ बघताच  दोन युवकांनी नदीच्या पात्रात उडी घेतली.ही घटना मंगळवारी सकाळी घडली.
-स्वाती लांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वरोरा

वरोरा तालुक्यातील माढेळी गावानजीक वडगाव हे गाव आहे. गावाच्या शेतशिवारात हरिदास तुराणकर यांना शेतातील गोठ्याजवळ वाघ दिसला. त्यांनी आरडाओरडा करणे सुरू केले. आवाज ऐकून ग्रामस्थांनी धाव घेतली. वाघ झुडपात बसून असल्याने ग्रामस्थांना तो दिसला नाही. वाघाला ग्रामस्थ आल्याची चाहूल लागताच त्याने ग्रामस्थांच्या दिशेने झेप घेतली.

त्यावेळी वरोरा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा वडगावचे उपसरपंच प्रफुल आसुटकर व शैलेश आसुटकर त्याच्या अगदी जवळ होते. या दोघांनीही लगेच वेणा नदीच्या पात्रात उडी घेतली. त्यात ते जखमी झाले. मात्र त्यांचा जीव वाचला. पळापळीत चार ग्रामस्थ जखमी झाले. घटनास्थळी वन अधिकारी व कर्मचारी पोहोचले.

वाघाला पिटाळण्याकरिता फटाके फोडण्यात आले. घटनास्थळावर वाघाचे पगमार्क आढळून आले. तो अडीच ते तीन वर्षांचा असण्याची शक्यता आहे.

Pages