थंडीचा धान ; रोपावर परिणाम - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


थंडीचा धान ; रोपावर परिणाम

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:
चंद्रपूर जिल्ह्यातील धान पट्टयात खरीप बरोबरच उन्हाळी धानाची लागवड मोठया प्रमाणात केली जाते. काही शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली असली तरी जानेवारी महिन्यात रात्रीचे तापमान 8 अंश ते 10 अंश सेल्सिअसपर्यंत असल्याने जमिनीतील तापमान कमी झाले. धान रोपाच्या मुळाद्वारे अन्नद्रव्य शोषण कमी झाले. पानातील हरित द्रव्ये कमी होऊन रोपे पिवळी पडली.

प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावून पानातील पेशी मृत पावली. रोपे कमकुवत होऊन बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोपांवर झाला.एकंदरीत धान रोपामधील शरीरक्रीया मंदावणे, रोपांची वाढ खुंटणे अशाप्रकारे धान रोपांवर प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे .
परिस्थितीवर मात करण्यासाठी खालील उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी वनस्पतीशास्त्र वरिष्ठ भात पैदासकार, सिंदेवाही येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रा. डॉ. चिंता वाढली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी जी. आर. शामकुंवर यांनी केले आहे.

थंडीपासून धान रोपाचे संरक्षण करण्यासाठी धान रोपवाटिकेमध्ये. नर्सरीमध्ये किंवा धान पत्यामध्ये बांबूच्या कांबीचा किया चारीक लोखंडी सळाखीचा वापर करून कमान तयार करावी. पांडया प्लास्टिकचा वापर करून रोपापासून 50 सेमी उंचीवरून झाकावे. जेनेकरुन रात्रीच्या तपमानात रोपवाटिकेमध्ये 4 ते 5 अंश सेल्सियसने वाढ करता येईल. त्यामुळे अन्नद्रव्य जमिनीतून सहजपणे धानाची मुळे शोधून घेतील रोपे हिरवीगार राहतील. रोवणीस लवकर तयार होतील. धान रोपवाटिकेमध्ये रात्रीच्या वेळी पाणी द्यावे, धान रोपवाटिकेमध्ये जास्तीत जास्त आर्द्रता ठेवावी, अंधार करावा. सकाळी धान रोपावर पडलेले दवबिंदू बाबूच्या किंवा काठीच्या साहाय्याने खाली पाडावे. दर आठ दिवसातून एकदा लाकडाचा भुसा अंदाजे अर्धा ते एक किलो प्रतिदहा चौरस मीटर रोपावर टाकावे.

Pages