विदर्भस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


विदर्भस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर - राजुरा:

राजुरा क्लबकडून विदर्भस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन महात्मा फुले महाविद्यालय राजुराच्या पटांगणावर 20 ते 22 जानेवारी या तीन दिवसांत करण्यात आले आहे.

स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी वेकोली बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक एस. एस. डे यांच्या हस्ते आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, मराठी सिने अभिनेत्री पूजा सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहतील. या स्पर्धामध्ये पुरुष व महिला असे दोन गट विभागण्यात आले आहे. पुरुष गटामध्ये प्रथम पुरस्कार 71 हजार रुपये रोख व चषक, तर महिला गटासाठी प्रथम पुरस्कार 51 हजार रुपये रोख व चषक ठेवण्यात आले आहे.


Pages