अखिल भारतीय सरपंच परिषदेची चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी घोषित. - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


अखिल भारतीय सरपंच परिषदेची चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी घोषित.

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:

गावाची संसद असलेल्या ग्रामपंचायतीत निवडून येणाऱ्या सरपंचा समोरील प्रश्न समस्या सोडवण्यासाठी प्रशासनावर राज्यपातळीवर दबाव गट तयार करून गावाचा विकास साधण्या करिता अखिल भारतीय सरपंच सरपंच परिषद परिषद कार्य करीत आहे.

अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंतदादा पाटील. विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड देवा पाचभाई. विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई. मार्गदर्शक बापूरावजी मडावी यांच्या मार्गदर्शनात अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र देवरावजी कराळे यांचे अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली. सतीश नंदगीरवार जिल्हा उपाध्यक्ष. (सरपंच चिचबोर्डी ता सावली ).रत्नाकर चटप जिल्हा सचिव तथा प्रसिद्धी प्रमुख. (ग्रामपंचायत सदस्य नांदा फाटा ता कोरपना )अनिल सोनुले सहसचिव.(सरपंच सुशी दाबगाव ता मूल )मोरेश्वर लोहे कोषध्यक्ष. (माजी सरपंच कोठारी ता बल्लारपूर )विजय बल्की समन्व्यक.(माजी पंचायत समिती सभापती चंद्रपूर )पारस पिंपळकर संपर्क प्रमुख(ग्रामपंचायत सदस्य पिपरी ता चंद्रपूर ).वसुधा गुरुपुडे संघटक. उपसरपंच म्हसली ता नागभीड )मंगेश धाडसे प्रवक्ता. (उपसरपंच खांबाडा ता चिमूर )तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी उमेश धोटे.(सरपंच चौगान ता ब्रम्हपुरी )नर्मदा दत्ताभाऊ बोरेकर(सरपंच वडगाव ता वरोरा ).सपना तामगाडगे.(सरपंच आकसापूर ता गोंडपिपरी )शुभांगी आत्राम (सरपंच मिनगीरी ता सिंदेवाही )व चंद्रपूर जिल्ह्यातील अखिल भारतीय सरपंच परिषदेचे प्रत्येक तालुका अध्यक्ष हे जिल्हा कार्यकारणीचे पदसिद्ध सदस्य असतील

Pages