नाशिक आणि अमरावती पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहे. आज काळी 8 वाजेपासून पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या पसंतीच्या मतावर उमेदवार विजयी झाल्यास संध्याकाळी 6 वाजेपर्यंत निकाल लागू शकतो. मात्र, दुसऱ्या पसंतीवर निकाल लागल्यास रात्री निकालासाठी उशीर लागण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच भाजप व महाविकास आघाडी या निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. त्यामुळे शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या या परीक्षेत कोण बाजी मारणार?, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे.
नागपूर : ना.गो. गाणार - अडबाले
नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपचे ना. गो. गाणार व विदर्भ शिक्षक संघाचे सुधाकर आडबोले यांच्यात चुरस आहे. ठाकरे गटाचे गंगाधर झाडे यांना ऐनवेळी माघार घेण्यास सांगण्यात आले होते. गंगाधार झाडे यांच्या माघारीमुळे ठाकरे गटाचे शिवसैनिक नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुधाकर आडबोले यांची अडचण होऊ शकते. नागपूर शिक्षक मतदारसंघात एकूण 22 जण रिंगणात आहेत.
