रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

विसापूर: एक तरुण रेल्वे मार्गाने जात असताना मागून रेल्वेची जबरदस्त धडक बसली. या धडकेत त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी 2:15 वाजता दरम्यान बल्लारपूर- चंद्रपूर रेल्वे अप रुळावर घडली. अपघातात ठार झालेल्या तरुणाचे

नाव मोहन ऊर्फ गोलू देवराव बेलूरकर (32) रा. विसापूर असे नाव आहे. मोहन ऊर्फ गोलू हा देवराव या तिसरा मुलगा असून अविवाहित होता. त्याच्या हाताला काम नव्हते. मिळेल ते काम तो करत होता. मात्र मजुरी नियमित मिळत नाही. यामुळे तो त्रस्त होता. बुधवारी मोहन बल्लारपूर चंद्रपूर अप रेल्वे मार्गाने पुलाकडे जात असताना मागून धडधड करीत रेल्वे आली. वीज खांब क्रमांक 885 वी / 1 व 885 वी / 11 दरम्यान रेल्वेच्या जबरदस्त धडकेत त्याच्या देहाचे दोन तुकडे झाले. यात मोहन जागीच गतप्राण झाला. 

याची माहिती रेल्वेच्या सीआरपी पोलिसांना देण्यात आली. रेल्वे पोलिस मंगेश पायघन, शिवकुमार मीना व विसापूर पोलिस चौकीचे जमादार घनश्याम साखरकर व शिवराज वाघमारे यांनी घटनास्थळ गाठन पंचनामा केला.

Pages