आकाशातून झेपावणाऱ्या "त्या" रंगीत पट्टयाचे नागरीकांमध्ये कुतुहल - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


आकाशातून झेपावणाऱ्या "त्या" रंगीत पट्टयाचे नागरीकांमध्ये कुतुहल

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

गेवरा :आकाशात अचानक सायंकाळी एक रहस्यमयी रंगीत धावता पट्टा आढळून आला. सुमारे १४ मिनिटे तो दिसत होता. त्यानंतर तो दिसेनासा झाला. मात्र अचानक दृष्टीस पडलेल्या या प्रकाराने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. हा रंगीत पट्टा स्पेस एक्स स्टारलिंक उपग्रह असल्याचा संदेश काही समाज माध्यमावर फिरत होता.

गुरुवारी सायंकाळी 7.15 वाजताच्या दरम्यान पश्चिमेकडून उत्तर दिशेकडे एक रंगीत पट्टा धावत असल्याचे नागरिकांना दिसून आले. दृश्य फक्त दहा ते पंधरा मिनिटांचे होते. काही लोकांचे आकाशाकडे लक्ष गेले असता त्यांना त्याबद्दल कुतूहल निर्माण झाले.

मात्र ते नेमके काय आहे, याबद्दल काहीही कळू शकले नाही. याबाबत नागरिकांत वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. यापूर्वीही जिल्ह्यात पृथ्वीच्या दिशेने एक रिंग व गोळा अशा पद्धतीने आकाशातून झेपावला व सिंदेवाही तालुक्यात जमिनीवर पडला. अम्हा अशा पद्धतीचे नागरिकांत कुतूहल निर्माण करणारा प्रकार घडल्याने रहस्य उलगडण्याची उत्कंठा नागरिकांत आहे.

Pages