धक्कादायक: नराधम बापानेच केला स्वतःच्या मुलीवर बलात्कार - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


धक्कादायक: नराधम बापानेच केला स्वतःच्या मुलीवर बलात्कार

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

दुर्गापूर परिसरात राहणाऱ्या नराधम बापाने पोटच्या मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. पीडित मुलीने तक्रार दाखल करताच पोलिसांनी नराधम बापास अटक केली आहे. या घटनेमुळे बाप-लेकींच्या पवित्र नात्याला काळिमा फासला गेला आहे.

नराधम बापाचे दोन लग्न झाले आहे. पहिल्या पत्नीपासून प्राप्त झालेले अपत्य व नराधम पिता, दुसऱ्या पतीसह दुर्गापूर परिसरात वास्तव्यास आहे. नराधम बापाची पोटच्या पोरीवर वाईट नजर होती. नराधम बापाने त्याने दोन महिन्यांपूर्वी बळजबरीने पोटच्या मुलींवर लैंगिक अत्याचार केला.

याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पीडित मुलीने हिम्मत करून दुर्गापूर पोलिस ठाणे गाठून घटनेची तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कलम 376, 354, 506 अन्वये गुन्हा दाखल करून नराधम बापास अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सनावली.

Pages