अवैध कोंबडं बाजारावर पोलिसांची धाड - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


अवैध कोंबडं बाजारावर पोलिसांची धाड

Share This
खबरकट्टा/चंद्रपुर:
दुर्गापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वढोली परिसरात सुरू असलेल्या अवैध कोंबडा बाजारावर दुर्गापूर पोलिसांनी धाड मारीत आरोपींना ताब्यात घेतले आहे.

या कारवाईत 12 आरोपींना अटक करण्यात आली असून नगदी रुपये, मोटर सायकल, 4 नग कोंबडे व 2 काती चे कोंबड्यासह एकूण 4,11,990 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी कनिराम जाधव यांच्या नेतृत्वात पोहवा सुनील गौरकार, अशोक मंजुळकर, मंगेश शेंडे, मनोहर जाधव आदी दुर्गापूर पोलिसांनी केली आहे.

Pages