जंगलात फासे लावून चितळाची शिकार: मासंसह दोघांना अटक - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


जंगलात फासे लावून चितळाची शिकार: मासंसह दोघांना अटक

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:

राजुरा : मध्य चांदा वन विभागातील राजुरा वन परिक्षेत्रातील टेंभूरवाही विटातील कक्ष क्र. 167 मध्ये बुधवारी सकाळी तुलाना येथील चार जणांनी जंगलात फासे लावून चितळाची शिकार केली. याप्रकरणी वन विभागाने मांसासह दोघांना अटक केली आहे.

वन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, टेंभूरवाही कक्ष क्र.167 मध्ये फासे लावून चितळाची शिकार केली असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली. त्या आधारे वन कर्मचारी वनात जाऊन शोध घेत असताना चितळाचे तुकडे करून भाग पाडले जात होते. वन कर्मचाऱ्यांनी चितळाच्या मांसासह दोघांना अटक केली. तर दोघे फरार झाले. वडगू काशीनाथ टेकाम व काशीनाथ टेकाम, अशी आरोपींची नावे आहेत. पुढील तपास राजुराचे उप विभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार व वन परिक्षेत्राधिकारी सुरेश येलकेवार यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते, संतोष संगमवार, वनरक्षक अर्जुन पोल्हे, सुनील मेश्राम, वर्षा ताघ, वनगजूर प्रकाश घोटे, दिनेश चंदेल, मंगल पाचभाई करीत आहेत.

Pages