गळफास घेऊन महिलेची आत्महत्या - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


गळफास घेऊन महिलेची आत्महत्या

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:
विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील वॉर्ड क्रमांक 4 मधील एका महिलेने राहत्या घरी किचनमध्ये घराच्या फाट्याला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

कविता राजू पंदीलवार (26) असे मृतक महिलेचे नाव आहे. ही राष्ट्रसंत तुकडोजी चौक विसापूरजवळील आपल्या राहत्या घरी पतीसोबत राहत होती.

मंगळवारी रात्री शेजारी महिलांसोबत नेहमीप्रमाणे तिने गप्पा मारल्या. त्यानंतर पतीसोबत रात्रीचे जेवण घेतले व झोपी गेली. बुधवारी सकाळी 6 वाजता तिचा पती उठला असता त्याला ती दिसली नाही. 
तो तिला शोधत किचनमध्ये गेला असता त्याला ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. लगेच ■ त्याने शेजाऱ्यांना बोलावले व विसापूर पोलिस चौकीला माहिती दिली.

हेड कॉ. घनश्याम साखरकर तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मर्ग दाखल करून घेतला. ■ आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मात्र, लग्नाला बरीच वर्षे होऊनही मूलबाळ होत नसल्यामुळे, शिवाय पती राजूला नियमित कामधंदा मिळत नसल्यामुळे तो • व्यसनाच्या आहारी गेल्याने ती त्रस्त होती. पुढील तपास पोलीस करीत आहे.

Pages