बनावट दारू कारखान्यातील फरारींना अटकेचे आदेश - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


बनावट दारू कारखान्यातील फरारींना अटकेचे आदेश

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

मूल तालुक्यातील चितेगाव येथे बनावट देशी दारू निर्मिती कारखान्यावर पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून मोठे रॅकेट उघडकीस आणले. मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी तातडीने कारवाई करून फरार आरोपींना तत्काळ अटक करण्याचा आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले. बनावट देशी दारू निर्मिती कारखान्यासंदर्भात नोंदविलेल्या जिल्हा अधिकाऱ्यांनी राज्य उत्पादनशुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक तथा तपास अधिकारी संदीप राऊत यांची बैठक घेऊन गुन्ह्यातील कागदपत्रांची तपासणी केली. या प्रकरणात समावेश असलेल्या आरोपींवर एमपीडीए व मुंबई दारूबंदी कायद्याचे कलम 13 नुसार कारवाई करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले.

Pages