स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्या;मनसेद्वारे कर्नाटक कोल लिमिटेड यांना निवेदन - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्या;मनसेद्वारे कर्नाटक कोल लिमिटेड यांना निवेदन

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

भद्रावतीतील स्थानिक रोजगाराना रोजगार द्या... मनसे शहर अध्यक्ष युगल.ग.ठेंगे यांच्या नेतृत्वात कर्नाटक कोल लिमिटेड (KPCL) यांना निवेदन. भद्रावती:- शहरातील आपली कंपनी भद्रावती तालुक्यातील बरांज मो. येथे कार्यरत असुन शासनाच्या नियमाप्रमाणे स्थानिक बेरोजगारांना नोकरीत सामावुन घेणे आवश्यक आहे. 

भद्रावती येथे विविध प्रकारच्या शैक्षणिक अर्हता घेऊन अनेक बेरोजगार नोकरीच्या शोधात असुन आपल्या कंपनी मध्ये बाहेर राज्यातील बेरोजगारांना प्राधान्य देण्यात आल्याचे बोलले जात आहे. कित्येक बेरोजगारांनी आपल्या कंपनी मध्ये नोकरीत सामावुन घेण्याबाबत आपले बायोडाटा व अर्ज दिलेले असुन त्या अर्जाना केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत. 

या करीत आपणास विनंती करण्यात येते की,बेरोजगारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेवर आधारित नोकरी देण्याचे करावे,अन्यथा बेरोजगारांना न्याय देण्यासाठी मनसे स्टाईल ने आंदोलन उभारू,त्यानंतर उदभनाऱ्या परिस्थिती व परिणामास आपले प्रशासन पूर्णतः जवाबदार राहील असा इशारा देण्यात आला.यावेळी शुभम धुर्वे, सचिन वरखडे, ऋषी वरखडे, अरपित मांडवगडे, अश्विन भाऊ, महादेव वरखडे, अभि उमरे चिन्मय मण्डल व इत्यादींनीची उपस्तिथी होती.*

Pages