तेरवीएवजी केली जनतेच्या आरोग्याची तपासणी - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


तेरवीएवजी केली जनतेच्या आरोग्याची तपासणी

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:

भेजगाव : आई-वडिलांनी घडविलेल्या संस्काराच्या भरोशावर अनेक मुले- मुलींनी आकाशाला गवसणी घातली असली तरी आई-वडिलांचे म्हातारपण वृद्धाश्रमात घालवणारी तर दुसरीकडे आई-वडिलांच्या संस्काराची जाण ठेवून त्यांच्या जिवंतपणीच त्यांची सेवा करत मरणोत्तरही त्यांच्या नावाने सामाजिक कार्य करीत सामाजिक ऋण फेडणाऱ्यांची संख्या समाजात कमी नाही.

मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथील रहिवाशी व पोस्टमास्तर असलेले रमेश केशव निकुरे (62) यांचे 8 जानेवारी रोजी निधन झाले. त्यामुळे सामाजिक रीतीरिवाजाप्रमाणे त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम होणे अपेक्षित होते. मात्र, त्यांचा मुलगा सोनेरी ध्येय बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रोहित निकुरे यांनी तेरवीचा कार्यक्रम न घेता गडीसुर्ला व परिसरातील नागरिकांना आरोग्य शिबिराचा लाभ घेता यावा, म्हणून त्यांनी रविवारी आरोग्य शिबिराचे आयोजन करून वडिलांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी आरोग्य शिबिरात 700 नागरिकांनी सहभाग नोंदविला. शिबिरात रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आले. शिबिरात चंद्रपुरातील नामवंत डॉक्टरांचा चमू उपस्थित होता. यात प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे, पॅथॉलॉजिस्ट डॉ. राकेश गावतुरे, फिजिशियन डॉ. तिरथ उराडे, सर्जन डॉ. रूपेश सोनडवले, डॉ. अनिकेत बालकुटे, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अमेय झरकर, जनरल फिजिशियन डॉ. विवेक यजलवार, जनरल फिजिशियन डॉ. दीपक जोगदंड आदी वैद्यकीय चमू उपस्थित होते. या शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.

Pages