नागपूर शिक्षक आमदार : सुधाकर अडबाले विजयी - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


नागपूर शिक्षक आमदार : सुधाकर अडबाले विजयी

Share This

खबरकट्टा / अपडेट्स :

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महावीकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी झाले आहे.या निवडणुकीत एकूण 22 उमेदवार निवडणुकीत विद्यमान आमदार नागो गाणार हे मागील 2 टर्म पासून आमदार होते, मात्र पक्षांतर्गत नाराजी असल्याने त्यांचा पराभव झाल्याचे बोलल्या जात आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना 14 हजारांपेक्षा जास्त मते मिळाली तर भाजपचे नागो गाणार यांना 6 हजार 300 मतांवर समाधान मानावे लागले.

-------------------------------------

मतमोजणी सुरू; गाणारांची हॅट्ट्रिक की परिवर्तन, गुरुजींचा कौल कुणाला ?

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात आघाडीचे उमेदवार आज दुपारी 3 वाजता पर्यंत घोषित झालेल्या निकालामध्ये पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये सुधाकर अडबाले यांनी 5000 मतांच्या च्या वर आघाडी घेतली आहे.

खबरकट्टा / नागपूर :

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून सुरुवात झाली आहे. २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतमोजणीपूर्वी प्रमुख उमेदवार व नेत्यांनी विजयाबद्दल दावे केले आहेत. भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार हे विजयाची हॅट्ट्रिक मारतात की सुधाकर अडबाले, राजेंद्र झाडे परिवर्तन घडवतात, याकडे शिक्षकांसह राजकीय वतुर्ळाचे लक्ष लागले आहे.

सहा जिल्ह्यांमध्ये सरासरी ८६.२६ टक्के मतदान झाले. ३९ हजार ८३४ पैकी ३४ हजार ३५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अजनी येथील समुदाय भवनात सकाळी ७:३० वाजता मतपेट्या बंद केलेली स्ट्राँगरूम उघडण्यात आला. प्रत्यक्ष मतमोजणीस सकाळी ८ वाजतापासून सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी मतमोजणी केंद्रावर उपस्थित मतमोजणी अधिकारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी आदींना गोपनीयतेची शपथ देण्यात आली

मतमोजणी अशाप्रकारे

- एकूण २८ टेबलवर मतमोजणी

- प्रत्येक टेबलवर १ हजार मतपत्रिका याप्रमाणे मतमोजणीस सुरुवात

- उमेदवार व प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी उपस्थित राहण्याची परवानगी

- मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येईल. उमेदवार घोषित होऊन त्यास निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

Pages