मनोरुग्णालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


मनोरुग्णालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:

सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता एका अज्ञात युवकाने फोन करत बॉम्बस्फोट करत धमकी दिली होती

नागपूर शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालय आणि इंदिरा गांधी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेयो) मध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा फोन पोलिसांच्या 112 वर आला. त्यामुळे पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली.

पोलिसांचे बॉम्ब शोधक-नाशक पथक (बीडीडीएस), श्वानपथकासह मोठा ताफा दोन्ही ठिकाणी रवाना करण्यात आला. सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता हा फोन एका अज्ञात युवकाने केला होता. मात्र, पोलिसांनी धमकीच्या फोनला गांभीर्याने घेत तअनेकांनी धोका ओळखून सावध पवित्रा घेत पळ काढला. श्वान पथक आणि बीडीडीएस पथकाने मेयो आणि प्रादेशिक रुग्णालयाचा परिसर पिंजून काढला. मात्र, रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही.पास सुरु केला. फोन करणाऱ्याचाही पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी मेयो रुग्णालयात अचानक बंदोबस्त वाढवला आणि शोधाशोध सुरु केली.

Pages