गुरू-शिष्यच्या नात्याला काळीमा ;मुख्याध्यापकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


गुरू-शिष्यच्या नात्याला काळीमा ;मुख्याध्यापकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर :
गुरु शिष्यचा नात्याला काडीमा फासणारी घटना जिल्ह्यात घडली आहे. सावली तालुक्यातील सोनापूरयेथील सुभाषचंद्र बोस शाळेचे मुख्याध्यापकावर एका विद्यार्थिनीचा विनयभंगकेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्याध्यापक पसार आहे.
सावली तालुक्यातील सोनापूर येथे सुभाषचंद्र बोस शाळा आहे. येथे आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग भरतात. या शाळेचे संस्थाध्यक्ष सुभाष गिरडकर आहेत. तेच या शाळेचे मुख्याध्यापक आहे. या शाळेत एकूण नऊ कर्मचारी कार्यरत आहे. मुख्याध्यापक मूल येथून जाणे-येणे करतात. या शाळेत सोनापूर आणि सामदा येथील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. सामदा येथील सहा विद्यार्थिनी या शाळेत शिकताक. त्या कधी सायकलने, तर कधी पायदळ जाणे-येणे करतात.

पीडित मुलीचे आई-वडील मिरची तोडण्यासाठी बाहेरगावी गेले. त्यामुळे मुलगी मुख्याध्यापक गिरडकर यांच्या दुचाकीनेच जाणे-येणे करीत होते. पीडित मुलगी नेहमीप्रमाणे आपल्या घरून शाळेत जाण्यासाठी निघाले. गावातील नागोबा मंदिर देवस्थानाजवळ मुख्याध्यापक तथा संस्थाध्यक्ष सुभाष गिरडकर भेटले. त्यांनी चालत्या गाडीवरच मुलीचा हात पकडून अंगाला स्पर्श करून विनयभंग केला. ही बाब मुलीने ग्रामपंचायतीत जाऊन सरपंच जयश्री मडावी, उपसरपंच मुकेश भुरसे आणि इतर पदाधिकारी यांना सांगितली.

उपसरपंच भुरसे यांनी सायंकाळी मुख्याध्यापक गिरडकर यांना ग्रामपंचायतीत बोलावून कानउघडणी केली. स्वतः सरपंच, उपसरपंच यांनी शाळेत जाऊन मुलांची चौकशी केली. त्यानंतर या घटनेची माहिती ठाणेदार आशीष बोरकर यांना दिली. दोन दिवसानंतर पीडित मुलीचे आई-वडील व गावातील काही मुलींनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

Pages