तुरीची मळणी करतांना मजूर थ्रेशरमध्ये सापडला - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


तुरीची मळणी करतांना मजूर थ्रेशरमध्ये सापडला

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:
पोंभूर्णा:- तालुक्यातील चेक नवेगाव येथे तुरीची मढणी करीत असताना एका मजूराचा थ्रेशरमध्ये हात गेल्याने थेट मानेपर्यंत ओढला गेला व दुर्देवी घटनेत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारला दुपारी दोन वाजता च्या सुमारास घडली. मृतकाचे नाव महेश अरुण लोहे वय 22 वर्षे असे असुन तो चेक नवेगाव येथील रहिवासी आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील चेक नवेगाव येथील शांताराम कन्नाके यांच्या शेतामधील तुर काढण्यासाठी आष्टा येथील विजय बोढेकार यांच्या मालकीची थ्रेशर लावण्यात आली होती. चार मजूर कामावर होते. महेश तुरीची पेंडी टाकत असतांना उजवा हात मशीनमध्ये सापडल्याने तो ओढल्या गेला. व मानेपर्यंतचा भाग मशीनीत दबून त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोंभूर्णा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोंभूणी पोलीस करीत आहेत.

Pages