अभ्यासासाठी रागविल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या; घरीच गळाफास घेऊन संपविले जीवन - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


अभ्यासासाठी रागविल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या; घरीच गळाफास घेऊन संपविले जीवन

Share This
खबरकट्टा/ चंद्रपूर:

गडचिरोली : दहावीचे वर्ष असल्याने अभ्यास करण्यावरून आईने मुलीला रागावले असता, रागाच्या भरात मुलीने घरातील बेडरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली.

पुनम गाथाराम निकुरे (16) रा. इंदिरानगर, गडचिरोली असे मृत मुलीचे नाव आहे. पुनम ही शहरातील राणी दुर्गावती विद्यालयात दहाव्या वर्गात शिकत होती. दहावीची परीक्षा जवळ आली असतानही पुनम अभ्यास करीत नव्हती. अभ्यास करण्यासाठी आईने सांगितले असता पुनमने ही बाब मनावर घेतली.

आईने पुनमला आंघोळ करण्यासाठी गरम पाणी टाकून ती थोड्या वेळासाठी घराच्या बाहेर निघाली. मुलगी आंघोळ करीत असावी, असा तिचा अंदाज झाला. घरी येऊन बघितले असता तिने घराच्या बेडरूममध्ये ओढणीने आत्महत्या केली असल्याचे आढळून आले. तक्रारीवरून गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pages