खबरकट्टा Exclusive :काँग्रेस हायकमांड प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारीत : - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


खबरकट्टा Exclusive :काँग्रेस हायकमांड प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारीत :

Share This
येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिका लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येतात. म्हणून लोकांच्या कामाचा विचार करता प्रादेशिक जातीय समीकरणांसोबत काँग्रेसचा जास्तीत जास्त प्रचार करू शकणार असे आक्रमक नेतृत्व प्रदेशाध्यक्ष म्हणून हवं असणार आणि तसं असेलच तर या यादीत कोणते नेते येतात. कोणते नेते सक्षमपणे नाना पटोले यांना रिप्लेस करू शकतात हे पाहणं गरजेचे आहे.

खबरकट्टा / Exclusive :गोमती पाचभाई, चंद्रपूर 

काँग्रेस हायकमांड प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. सत्यजित तांबे यांच बंड,त्यानंतर झालेला खुलासाही, थोरात यांचं पत्र आणि नाना पटोलेबाबत वाढती नाराजी या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता काँग्रेस हायकमांड प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. या बातम्या खरे आहे की नाना पटोले यांच्या विरोधात तयार करण्यात आलेल्या यंत्राचा एक भाग आहेत. येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच. पण तूर्तास तरी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून काँग्रेसच दूर करणार असेल तर पक्षाकडे दुसरे नेत्यांचे पर्याय काय आहेत. हा महत्वाचा मुद्दा आहे.

नाना पटोले यांना रिप्लेस करून प्रदेशाध्यक्ष पदावर विराजमान होऊ शकणाऱ्या नेत्यांमध्ये दोन गट पाहता येतात. एक म्हणजे काँग्रेसला नवे प्रयोग न करता अनुभवी नेत्यांवरच जबाबदारी दिली. या नेत्याकडून पक्ष एकसंध घेऊन प्रचार करण्याची रणनीती आखली जाईल. अशा नेत्यांच्या यादीत अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासारखे नेते नाही तर काँग्रेस पक्ष नवा प्रदेशाध्यक्ष म्हणून एक नवीन नेत्याला देखील बळ देऊ शकतो.

जुन्या नेत्यांना विचार करू नये व नेतृत्व तयार करण्याच्या ऑपरेशनचा भाग म्हणून काँग्रेस सतेज उर्फ बंटी पाटील, सुनील केदार अशा नेत्यांना पुढे आणू शकतो. तुर्तास तरी एका एका नेत्याचे नाव आणि त्या संबंधित नेता काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष का होऊ शकतो आणि कोणत्या मर्यादा येऊ शकतात ते पाहू.

तर पहिल्या नंबरवर नाव असू शकतात. ते अशोक चव्हाणांचं सिनियर लिडर मराठवाड्यातले मराठा नेतृत्व आणि सर्व गटांसोबत समन्वय हे तीन फॅक्टर असणारे अशोक चव्हाण, कडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याण्यासाठी पुढे जाईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशोक चव्हाण, सीनिअर लिडर मुख्यमंत्रिपदासाठी प्रदेशाध्यक्ष पदाचा अनुभव त्यांना आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोन्ही नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. शिवाय काँग्रेसला राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांसोबत समन्वय साधत पक्षातल्या गटातटाचे राजकारण संपवायचे आणि अशा वेळी अनुभवी अशोक चव्हाण पुढे येऊ शकतात. अशोक चव्हाण यांचे नाव समोर येण्याचा दुसरा महत्त्वाचा कारण नेते म्हणजे अशोक चव्हाण मराठवाड्यातून येतात.

विदर्भ आणि मराठवाड्यातून विधानसभेच्या एकूण आठ जागा येतात. काँग्रेसकडे यापैकी तेविस जागा आहेत.2014 मध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातून 19 जागा होत्या. काँग्रेसने विदर्भ आणि मराठवाड्यातून एकूण कमी जागा होत्या. 2009 साली 29 इतक्या जागा आल्या होत्या. अर्थात पश्चिम महाराष्ट्राचा बेस कायम ठेवून विदर्भ आणि मराठवाड्यातून पक्षाचा जागा वाढवण्यावरती काँग्रेसचा भर असू शकतो आणि अशा वेळी मराठवाड्याचे म्हणून अशोक चव्हाणांचं मूल्य वाढतो.

सोबतच राज्यात सध्या मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, मराठा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मराठा प्रदेशाध्यक्ष देव जातीची समीकरणं देखील सोडविण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाऊ शकतो. पण अशोक चव्हाणांच्या बाबतीत सर्वच गोष्टी चांगल्या नाही. एक तर गेल्या काही वर्षांपासून अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा होतात. शिवाय अशोक चव्हाणांचे वय 65च्या घरात असल्याने किती आक्रमकपणे प्रचार करू शकतील हाही प्रश्न आहे. त्यांच्या भूमिकेबाबत संशयाचे वातावरण आणि त्यांचं वय या दोन्ही गोष्टी. अशोक चव्हाण याबाबतीत निगेटिव्ह ठरू शकतात. 

दुसरे प्रमुख कारण आहे ते म्हणजे बाळासाहेब थोरात, पश्चिम महाराष्ट्र मराठा सहकार सीनियर लीडर आणि अनुभव या गोष्टीचा दुजोरा विरोधी बाळासाहेब थोरात देखील पुढील प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या आरोपांनंतर नाना पटोले बॅकफुटवर आले असतील तर झालेला बंडखोर बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्ष करून देखील भरून काढण्याचा प्रयत्न काँग्रेस हायकमांड करू शकतं. एक तर पूर्वीपासून होत असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रावर ती पुन्हा कमाल निर्माण करणा राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत समान विचारावर बोलू शकेल असा नेतृत्व ठेवणार आणि गटाचा समन्वय साध्य करण्यासाठी थोरात त्यांच्या गळ्यात पुन्हा प्रदेशाध्यक्षपदाची बाहेर पडू शकते.
पण सर्वात मोठा अडथळा येऊ शकतो. तो विदर्भ आणि पटोले गटाकडून. तरीही पुनरागमन करणे जबाबदारी दिली असता तांब्यांच्या आरोपांवर शिक्कामोर्तब होऊ शकेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे काहीही करून आजच्या परिस्थितीत नाना पटोले यांचा गट तरी मान्य करणार नाही आणि विदर्भातून बॅकफूटवर जाण्याची परिस्थिती पक्षाची हायकमांड येणार नाही आणि म्हणूनच तिथे थोरात यांचे नाव घेता येतो.पण त्यांच्या नावाचा चान्स कमी राहतो.
यात तिसर नाव घेता येईल ते. पृथ्वीराज चव्हाणांच्या कोणे एकेकाळी सर्वांत विश्वासू आणि त्याच काळात सर्वात मागे पडलेले नाव म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांचं केंद्रातल्या जी कितीतरी गटाचे नेते असल्याने पक्षाच्या हायकमांड कडून पृथ्वीराज चव्हाण यांना दुर्लक्षित केला जात आहे असं बोललं जातं. पण आताच्या घडामोडीचे उदाहरण द्यायचं झालं तर आताच अदानी प्रकरण आणि त्यावर एकूणच पातळ्यांवर सडेतोड टीका करण्याची वेळ आली तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुन्हा चर्चेत येऊ लागलं. समाज व काँग्रेसला आक्रमक लढण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला दुसरा पर्याय नसतो.राज्य मुख्यमंत्रीपदाचा अनुभव  आणि पीएमओतील अनुभव या जोरावर पृथ्वीराज चव्हाण प्रदेश अध्यक्ष होऊ शकतात. पण इथेही मुद्दा आहे तो त्यांचा वयाचा आणि गटातटाचे राजकारण संपविण्याच्या मर्यादेचा पृथ्वीराज चव्हाण राज्य पातळीवरचे नेते कधीचनव्हते.

केंद्रात मोठ्या झालेल्या चव्हानांना राज्याच्या राजकारणात अचानक उतरवण्यात आले. शिवाय शरद पवारांसोबत त्यांचा कधीच पटले नाही. उलट सिंचन घोटाळ्याला त्यांनीच हवा दिल्याच्या चर्चा रंगत असतात. अशा वेळी पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादीसोबत जुळवून घेण्यासाठी मर्यादा येत जातील. शिवाय लोक संघटनांच्या पातळीवर येणाऱ्या मर्यादांमुळे पृथ्वीराज चव्हाण या यादीतून बाहेर देखील जाऊ शकतात.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होऊ शकेल असं नाव येताच ते म्हणजे विजय वडेट्टीवार यांचा विदर्भ ओबीसी आणि सिनिअर नेत्यांसोबत किमान संवाद या तीन गोष्टी साध्य करणारा प्रदेशाध्यक्ष काँग्रेसने शोधला तर विजय वडेट्टीवार यांचे नाव हमखास येऊ शकेल.

येत्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न या पार्श्वभूमीवर  विजय वडेट्टीवार यांना बळ देण्याचे काम काँग्रेस करू शकतात आणि शिवाय विजय वडेट्टीवार विदर्भातून येत असल्याने प्रादेशिक समतोल साधण्याचा गणित देखील काँग्रेसला शक्य आहे. विजय वडेट्टीवार याबाबत बोलायचे झाले तर चंद्रपूर मधून काँग्रेसचे एकमेव खासदार निवडून आले. बाळू धानोरकरांचा विजय झाला आणि त्याचे कारण विजय वडेट्टीवार असे महाराष्ट्रासारख्या हक्काच्या राज्यात किमान एक जागा तरी निवडून आणून किमान काँग्रेसी प्रतिष्ठा जपण्याचे काम विजय वडेट्टीवार यांनी केले. पण या सगळ्या जमेच्या बाजू असल्या तरी काँग्रेस अंतर्गत असणाऱ्या गटातटाच्या राजकारणावरही विजय वडेट्टीवार होड घेऊ शकतात का? हा मुख्य प्रश्न आहे.

अर्थात चार सीनियर नेत्यांच्या नावाचा डाव काँग्रेस हायकमांड ठरवू शकेल. पण त्यापूर्वी नाना पटोले यांच्या नावापुढे माजी प्रदेशाध्यक्ष असा शिक्कामोर्तब काँग्रेस करेल का? हा महत्त्वाचा प्रश्न उरतोच.

Pages