विजेच्या धक्क्याने विज कामगाराचा मृत्यू...#Electrician dies due to electric shock - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


विजेच्या धक्क्याने विज कामगाराचा मृत्यू...#Electrician dies due to electric shock

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

वरोरा :तालुक्यातील खांबाडा येथील कंत्राटी कामगार म्हणून गेल्या 4 वर्षा पासून सतीश चिंधुजी तोडासे वय 22 वर्ष हा कंत्राटी कामगार म्हणून खांबाडा येथील महावितरणमध्ये काम करत होता. आज तो लाईन चे काम करायचे आहे म्हणून डीपी चा सप्लाय बंद करून, खाबावर चढला आणी त्याला विजेचा शॉक लागून खांबावरून पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. साय 5.30 च्या सुमारास ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. ही बातमी वाऱ्या सारखी पसरताच नागरिकांनीघटनास्थळी एकच गर्दी केली होती.#khabarkatta chandrapur 

महावितरण चे कर्मचारी व इंजीनियर घटना स्थळी पोहचून ज्या जागेवर घटना घडली त्या जागेची पाहणी केली. वरोरा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणी त्याची चमू घटनास्थळी पंचनामा करून बॉडी ला ताब्यात घेऊन शवविछेदना साठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवली.मृत कुटुंबाला महावितरण कडून 20 हजार ची मदत कॅश स्वरूपात घरच्यांना देण्यात आली. उर्वरित 3 लाख 80 हजार चेक स्वरूपात देण्यात येईल असे आश्वासन महावितरन चे इंजिनियर भोयर यांनी घरच्यांना दिले. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.#khabarkatta chandrapur

Pages