पत्नीस जिवंत जाळणाऱ्या पतीला जन्मठेपीची शिक्षा...#Life imprisonment for husband who burnt his wife alive - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


पत्नीस जिवंत जाळणाऱ्या पतीला जन्मठेपीची शिक्षा...#Life imprisonment for husband who burnt his wife alive

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

किरकोळ भांडणात पत्नीच्या अंगावर केरोसिन ओतून तिला जिवंत जाळले. यावेळी पतीच्या आईनेही सुनेला जाळण्यास प्रोत्साहित केले. या घटनेत पत्नी गंभीर भाजली आणि तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आठ वर्षांनंतर या घटनेचा निकाल लागला आणि न्यायालयाने आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिशिरकुमार हांडे यांनी बुधवारी दिला.

प्रशांत कृष्णराव लुटे (35, रा. फ्रुट मार्केट,यवतमाळ), असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अश्वीनी प्रशांत लुटे, असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह 2 मे 2014 रोजी प्रशांतसोबत झाला होता. पती, सासू व नणंद त्रास देत असल्याने अश्वीनीने महिला व बाल विकास संस्था, नागपूर यांच्याकडे तक्रार दिली होती.#khabarkatta chandrapur

दरम्यान 6 एप्रिल 2016 रोजी तिला जिवंत जाळण्यात आल्याचा आरोप अश्वीनीच्या नातेवाईकांनी केला. तिला उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. तिची मृत्यूपूर्वी जबानी कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समक्ष डॉक्टरांच्या उपस्थितीत झाली. घटनेच्या दिवशी पतीने भांडण केले आणि साखळीने मारहाण केली. यावेळी सासूही उपस्थित होती.#khabarkatta chandrapur

पतीने अगांवर रॉकेल टाकून पेटवून दिले. त्यावेळी पती व सासू दोघेही तिथे होते. दरम्यान यवतमाळ येथून विवाहितेला नागपूरच्या मेयो हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथेही कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमक्ष तिने जबानी दिली. त्यातही पती व सासूने जाळल्याचे सांगितले. उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडगाव रोड पोलीस ठाण्यात पती, सासू व नणंदेविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. तपास करून पोलीस उपनिरीक्षक सारंग मिरासे यांनी दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले.


Pages