आदर्श शाळेत प्रवेशोत्सव साजरा: विध्यार्थीना मोफत पाठ्यपुस्तक वितरण...#Adarsh School Entrance Celebration: Free textbook distribution to the students - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


आदर्श शाळेत प्रवेशोत्सव साजरा: विध्यार्थीना मोफत पाठ्यपुस्तक वितरण...#Adarsh School Entrance Celebration: Free textbook distribution to the students

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सतीश धोटे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष मनोहर साबनानी, सचिव भास्करराव येसेकर, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकीवार, संचालक मधुकरराव जानवे, अविनाश निवलकर, आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट युनिट लीडर बादल बेले आदींची उपस्थिती होती.#khabarkatta chandrapur

कार्यक्रमाच्या सुरुवातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ओम महादेव झाडे व सरिता गणेश लोहबळे या दोन्ही विध्यार्थीना शाळेत पहिला प्रवेश केल्यामुळे भेटवस्तू देऊन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे भेटवस्तु देऊन मान्यवराच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कल्लूरवार यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका नलिनी पिंगे यांनी व आभार सहाय्यक शिक्षिका जयश्री धोटे यांनी केले. प्लास्टिक बंदी विषय घेऊन राष्ट्रीय हरित सेना व स्काऊट गाईड विभागाने सेल्फी पॉईंट तयार केला होता. या सेल्फी पॉईंटवर अनेक विध्यार्थी शिक्षक यांनी फोटो घेऊन प्लास्टिक बंदी करिता संकल्प घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश धोटे यांनी नवागतांचे स्वागत करीत विध्यार्थीनी कठोर परिश्रम, अभ्यास करून स्वतःचे, आपल्या परिवारासोबतच शाळेचे व देशाचे नावलौकिक करावे असे प्रतिपादन केले.#khabarkatta

विध्यार्थीनी कुठल्याही अनावश्यक गोष्टीच्या मागे न धावता, मोबाईल, टीव्ही यांचा वापर न करता विध्यार्थी जीवनात अभ्यासावरच लक्ष केंद्रित करावे अश्या सूचनाही केल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुराच्या शिक्षक, विद्यार्थी, सेविका यांनी आता परिश्रम घेतले. मान्यवरांच्या हस्ते व शाळेत पहिला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते रिबीन कापून वर्गखोलीत प्रवेश घेण्यात आला. पहिल्या वर्गातील विध्यार्थीच्या विविध स्पर्धा घेऊन त्यांना बक्षीस देण्यात आले.#khabarkatta


Pages